Wednesday, 1 February 2012

टॉप मराठी वाहिन्या (TOP MARATHI CHANNELS)

टॉप मराठी वाहिन्या (TOP MARATHI CHANNELS)

आजकाल टि. व्ही. प्रत्येकाच्या घरात दिसतो आणि त्यातून मराठी वाहिन्या तर उत्तम कार्यक्रम दाखवून लोकांचे मनोरंजन करत आहेत. माझा हाच प्रयत्न आहे कि मराठी माणसाला मराठी वाहिन्या किती आणि कोणत्या हे कळावे. अगदी हिंदी वाहिन्यापेक्षा हि सुंदर कार्यक्रम आपल्या मराठमोळ्या वाहिन्यावर पाहायला मिळते. त्या वाहिन्या खालील प्रमाणे ....



याचे शीर्षक गीतच जबरदस्त हिट आहे. ऐकूनच अंगावर काटा येतो. त्यात ".....शिवबाची तलवार तळपली आणि महाराष्ट्र अस्मिता फडकली, संताच्या अमृतवाणीने जीवन झाले वैभवशाली...." या ओळी ऐकल्या कि उर भरून येतो.यावर आवाज  महाराष्ट्राचा, नाना -ओ - नाना,वृंदावन अणि ब्रम्हांडनायक हे लोकप्रिय मलिका आहेत.

कार्यक्रमाची सूची :

  • आवाज  महाराष्ट्राचा 
  • नाना -ओ - नाना 
  • वृंदावन 
  • कन्यादान 
  • ब्रम्हांडनायक 



नुकताच लौंच झालेला पण प्रत्येकाच्या घरी आवर्जून पहिली जाणारी वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह. "राजा शिवछत्रपती" आणि "अग्निहोत्र" हे कार्यक्रम या वाहिनीची ओळख. शिवाजी महाराजांचा सामर्थशाली इतिहास घराघरात पोहचवणारी आणि कदाचित याच मुळे सगळ्यांची पहिली पसंद होणारी हि वाहिनी.अग्निहोत्रातली पात्रे तर घरातलीच आहे अशी जाणीव करून देणारी वाहिनी ...खरच मी स्टार समूहाचे आभार मानतो.

माझ्या आवडत्या मालिकेचे शीर्षक गीत 



कार्यक्रमाची सूची :


  • भांडा सौख्यभरे
  • दोन किनारे दोघी आपण
  • पुढचे पाऊल
  • स्वप्नांच्या पलीकडचे
  • बंध रेशमाचे 
  • सुवासिनी
  • धींक चिका
  • लक्ष्य
  • अनोळखी दिशा




झी मराठी वाहिनीची सुरुवात इ.स. १९९९ मध्ये झाली. इ.स. २००४ पर्यंत ही वाहिनी अल्फा मराठी या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन कथामालिका, चर्चा, पाककृती, प्रवासवर्णनपर मालिका, बातम्या, मराठी चित्रपट आणि क्रीडाविषयक कार्यक्रम दाखवतात. प्रत्येक महिन्यातील एका रविवारी "महासिनेमा" अंतर्गत एका लोकप्रिय नवीन मराठी सिनेमाचे प्रदर्शन करण्यात येते. आतापर्यंत महासिनेमा मध्ये श्वास, अगं बाई अरेच्चा!, आई, सातच्या आत घरात हे चित्रपट दाखवण्यात आले आहेत.

कार्यक्रमाची सूची :
  • मराठी पाऊल पडते पुढे
  • एकाच ह्या जन्मी जाणू
  • अरुंधती
  • झांसीची राणी 
  • एका लग्नाची दुसरी गोष्ट
  • आभास हा
  • मधु तिथे आणि चंद्र इथे
  • होम मिनिस्टर
  • पिंजरा
  • कुंकू
  • आम्ही सारे खवय्ये



मराठी प्रेक्षकांत अत्यंत लोकप्रिय असलेली ही वाहिनी असून चार दिवस सासूचे, ई टीव्ही न्यूज, या गोजिरवाण्या घरात या काही मालिका घराघरांत पोहोचल्या आहेत. माझी आवडती मालिका, कॉमेडी एक्सप्रेस तर फुल हिट मालिका आणि टाइमपास आहे. हिंदी हसवणाऱ्या मालिका झक मारतील या मालीकेसमोर इतकी जबरदस्त कोमेडी दाखवतात.

कार्यक्रमाची सूची :
एक मोहोर अबोल
चार दिवस सासूचे
या वळणावर
शुभारंभ
सावर रे
परफेक्ट बॅट्चलर
कॉमेडी एक्सप्रेस 



आणखीन एक मराठी वाहिनी, वरील वाहिन्याप्रमाणे हि सुध्धा तितकीच लोकप्रिय आहे. यावरचे भैरोबा, श्री गीतायोग, मधुरा आणि पुणेरी मिसळ या लोकप्रिय मालिका आहेत. 

कार्यक्रमाची सूची :

फमिली डॉक्टर
श्री गीतायोग 
मधुरा
साम संजीवनी
सुगरण
भैरोबा
हि वाट दूर जाते
लिंबू टिंबू
पुणेरी मिसळ
टोपं २४
वेग



सह्याद्री ही दुरदर्शन ची मुखत्वेकरुन महाराष्ट्रात काम करणारी उपग्रह व प्रादेशिक वाहिनी आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी दुरदर्शनची वाहिनी आहे. याचे २४ तास प्रक्षेपण सुरु असते. मराठी बातम्या व मालिकांसाठी या वाहिनीस बराच मोठा प्रेक्षकवर्ग आहे. दुरदर्शन हे स्वतःचे कार्यक्रम स्वतःच निर्माण करते. काही कार्यक्रम, विशेषतः मालिका, ह्या खाजगी निर्मात्यांकडून पण बनविल्या जातात.


मराठी भाषेतून बातम्यां २४ तास चालवणारी हि वाहिनी.



आणखीन एक, मराठी भाषेतून बातम्यां २४ तास चालवणारी हि वाहिनी.



मराठी चित्रपट आवडणाऱ्यासाठी हि सर्वोत्तम वाहिनी. बरेच जुने, नवीन चित्रपट या वाहिनीवर २४ तास चालूच असतात.


२४ तास मराठी गाणी वाजवणारी पहिली मराठी वाहिनी. अगदी जुन्या गाण्यापासून नविन गान्यापर्यंत  सर्व काही या वाहिनीवर आईकायला आणि बघायला हि मिळते. खास करून तरुणांना भावलेली आपल्या मायमराठी भाषेतली गाणी दाखवणारी हि वाहिनी महाराष्ट्रभर अगदी कमी वेळात लोकप्रिय झाली आहे.


आणखीन एक, मराठी भाषेतून बातम्यां २४ तास चालवणारी हि वाहिनी. बघा तिन तिन मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्या. माहिती होत्या का तुम्हाला .....!!!


या शिवाय हिस्ट्री टी.व्ही., नॅशनल जिओग्राफी, डीस्कवरी, संगीत मराठी, कार्टून नेटवर्क या सारख्या मराठी वाहिन्या ही लवकरच प्रदर्शित होणार आहेत. यावरूनच कळते मराठी माणसांचा आपल्या मराठी भाषेकडे किती कल आहे तो! इत्केतच नहीं तर या वाहिन्या महाराष्ट्राबाहेर अणि अगदी देशाबाहेर ही मोठ्या आवडीने पाहिल्या जातात.

मराठी माणसाला त्याच्या मायबोलितिल मराठी वाहिन्या कळाव्या म्हणून हा प्रयत्न. वरीलपैकी बऱ्यापैकी वाहिन्या तुमच्या घरी असतीलच पण बाकि वाहिन्याचे काय? त्याही घरी दिसायला हव्यात ना!! नाहीतर उद्या बंद पडल्या की तुम्हीच बोलाल, मराठी वाहिन्या दिसत नाही म्हणून!!!

तस पण आता मराठी वहिन्यांचा स्तर हा बऱ्याच प्रमाणात उंचावला आहे, गरज आहे मराठी प्रेषकांची भरभरून साथ देण्याची अणि ती तुम्ही नक्की दयाल ....






Monday, 30 January 2012

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
 आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी